दुबईत होणाऱ्या ४५ वर्षांवरील व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
लातूर- दुबई येथील इनडोअर स्टेडियम मध्ये १८ ते २३ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लातूरच्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लबचे खेळाडू महेश शिवहर पाळणे यांची भारतीय संघात निवड झाली आहे.
दुबई येथे होणाऱ्या या मास्टर्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतासह स्पेन,पोलंड, युयेई, पाकिस्तान, फिलिपाईन्स, नेपाळ व युरोपियन युनियन संघाचा समावेश असणार आहे.पुणे येथे झालेल्या मास्टर्स व्हॉलीबॉल स्पर्धेतून महेश पाळणे यांची निवड झाली आहे.या संघात महाराष्ट्रासह केरळ,कर्नाटक,दिल्लीच्या खेळाडूंचा समावेश आहे.यापूर्वी महेश पाळणे यांनी अनेकवेळा राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून राज्य व विद्यापीठ संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.यासह ज्युनियर गटात भारतीय संघाच्या सराव शिबिरात सहभाग नोंदविला आहे.महाराष्ट्र संघाचे व नांदेड विद्यापीठाचे प्रशिक्षक व निवड समिती सदस्य म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.त्यांच्या या निवडीचे कौतुक जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख,रामानुज रांदड,जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष मोईजभाई शेख,विभागीय सचिव दत्ताभाऊ सोमवंशी,जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे,जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड,सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे,मुख्याध्यापक संतोष देशमुख,महाराष्ट्र क्लबचे सदस्य उमाशंकर पाळणे,सुरेश काळे,प्रवीण तावशिकर,विजय सोनवणे,कृष्णा पोतदार,ललित जोशी, पीएसआय विश्वजीत कासले, डॉ निलेश पौळ,नंदू भोसले,सद्दाम शेख,विठ्ठल कवरे यांच्यासह व्हॉलीबॉल खेळाडूंनी केले आहे.


