अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडतर्फे ५१,१११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द

0
123

लातूर : मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले, जनावरे व आप्तेष्टांचा मृत्यू झाला आणि उपजीविकेची स्वप्ने चुरगाळली. या संकटग्रस्त परिस्थितीत मदतीसाठी पुढे येत अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹५१,१११/- इतक्या रकमےचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

हा धनादेश ब्रिगेडचे मार्गदर्शक अॅड. व्यकटराव जी बेंद्रे यांच्या सूचनेनुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत संतुजी ब्रिगेडने ही मदत दिली.

या वेळी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या सहकार्याने शेतकरी आणि गोरगरीब जनता या नैसर्गिक संकटावर मात करून नव्या उत्साहाने उभी राहील, असा आम्हाला विश्वास आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here