मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने विक्रमवीर प्रा. डॉ. उन्मेष शेकडे यांचा सत्कार संपन्न

0
122

अहमदपूर, दि. ५ ऑक्टोबर २०२५ : स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथील मराठी विभागप्रमुख तसेच मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. उन्मेष शेकडे यांच्या “शाळेची पाखरं” या बालकाव्यसंग्रहाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाल्याने त्यांचा मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी शाखाध्यक्ष सत्यनारायण काळे यांच्या हस्ते प्रा. डॉ. शेकडे यांना शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. द. मा. माने, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मोहीब कादरी, प्रा. गुरुनाथ चवळे, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन बायजित, प्रा. यादव सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या निधनाबद्दल शाखेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म. सा. प. चे उपाध्यक्ष राम तत्तापुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष जिलानी शेख यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here