समाजात आदर्श पिढी निर्माण करण्याचे कार्य शिक्षकच करतो – माजी आ. मनोहर पटवारी

0
315

जवळगा : “समाजात आदर्श पिढी निर्माण करण्याचे कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होते. आजच्या घडीला समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी केवळ शिक्षकांची आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपले कार्य संपले असे समजू नये, तर आयुष्यभर समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे,” असे प्रतिपादन माजी आमदार मनोहर पटवारी यांनी केले.

शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक संतोष पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक उद्धव तावडे यांनी केले.

६ सप्टेंबर रोजी प्रियदर्शनी प्राथमिक विद्यामंदिर, जवळगा येथे प्राथमिक शिक्षक पांडुरंग श्रीनिवास पाटील यांच्या सेवानिवृत्त सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजनाने विधिवत सुरुवात झाली. यावेळी पांडुरंग श्रीनिवास पाटील यांचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने इंजि. अनिल मुळेरामलिंग मुळे यांच्या हस्ते भरघोस मानपत्र, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव इंजि. अनिल मुळे, शाळेचे अध्यक्ष व माजी सरपंच रामलिंग मुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, समाजसेवक लहुजी गंगापुरे, पांडुरंग हुडे, मुख्याध्यापक उद्धव तवडे, अरुण मुळे, सुनील मुळे, इंद्रजीत पाटील, हाणमंत बिराजदार, रमेश वाघ, पुंडलिक बिराजदार, विजयकुमार पाटील, संजीव रेड्डी, शिवाजी पाटील, रविंद्र इगे, सुरज मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महादेव विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य रामलिंग मुळे, नूतन प्राचार्य अनिल गाडे, शांतिनिकेतन विद्यालय, मुळकीचे मुख्याध्यापक चंद्रकांत बंडगर, तसेच संत भगवान विद्यालय, धामणगावचे मुख्याध्यापक रविकिरण साकोळकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात इंजि. अनिल मुळे यांनी शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच प्राचार्य रामलिंग मुळे, अनिल गाडे, चंद्रकांत बंडगर, रविकिरण साकोळकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here