लातूर : शाक्य संघ माता भिमाई ग्रुप लातूरच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे ग्रुपचे अध्यक्ष आयुष्मान शाहूराज कांबळे यांचे अध्यक्षतेखाली भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष दिलीप कांबळे, सचिव शिवाजी कांबळे, कोषाध्यक्ष रोहिदास कांबळे, सदस्य शंकर शिंदे, नरसिंग गायकवाड, अंगद कांबळे, सुशीम बनसोडे, मोहन कांबळे, बाबुराव कांबळे, अशोक कांबळे, अर्जुन किंकर, त्र्यंबक कवठेकर, प्रकाश बनसोडे यांच्याहह मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन भारताचे संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला.

