यशवंत विद्यालयाला ३ लाख १० हजार रुपयांचे पारितोषक प्रदान

0
88

अहमदपूर- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे मेजर ध्यानचंद सिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय खेळ दिनाचे आयोजन करण्यात होते.
यात क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने तीन लाख दहा हजार रुपयांचे पारितोषिकाचा धनादेश या कार्यक्रमात मुख्याध्यापक गजानन शिंदे यांना देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सहायुक्त मनपा सह आयुक्त रामदास कोकरे, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती उज्वला पाटील, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग चे युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी यशवंत विद्यालय अहमदपूर येथील तलवारबाजी खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू साईप्रसाद संग्राम जंगवाड व राष्ट्रीय खेळाडू दिव्यांका संतोष कदम यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
क्रीडा विभाग प्रमुख संतोष कदम , दीपक हिंगणे, प्रतिभा मिरजकर यांचे विशेष सहकार्य लाभले होते.
या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव डॉक्टर सुनिता चवळे, मुख्याध्यापक गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक एम. बी. वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here