20.3 C
New York
Sunday, July 6, 2025

आ. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त १५१ महिला भजनी मंडळांना साहित्यांचे वाटप

लातूर : आध्यात्मीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह, राजकारणात अग्रेसर राहून गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे, शेतकरी, शेतमजूराच्या न्यायहक्कासाठी संघर्ष करणारे भाजपाचे नेते विधान परिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांच्‍या जन्मदिनानिमित्ताने लातूर येथील ‘प्रयाग” या निवासस्थानी भाजपासह विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी दुरध्वनीच्या माध्यमातून जन्मदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या, लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध गावातील १५१ महिला भजनी मंडळांना आ. रमेशअप्पा कराड मित्रपरिवाराच्या वतीने साहित्याचे वाटप करण्यात आले तर जन्मदिनाच्या निमित्ताने विविध गावात समाजउपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.

गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, शेतकरी शेतमजूराच्या न्यायहक्कासाठी सतत संघर्ष करणारे, गरजुंना वेळोवेळी मदत करणारे, कार्यकर्त्यांना बळ देवून मान आणि सन्मान मिळवून देणारे, हजारो कुटूंबांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून दिलासा देणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे आणि आध्यात्मीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह, राजकारणात अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांचा गुरुवार ३० मे रोजी जन्मदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. आ. रमेशअप्पा कराड मित्र परिवाराच्या वतीने लातूर येथील अंबाजोगाई रोड वरील एमआयटी परिसरातील प्रयाग या निवासस्थानी अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळयाला लातूर ग्रामीणसह जिल्हाभरातील भाजपा व विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मित्रपरिवारांनी दिवसभरात आ. रमेशअप्पा कराड यांचा यथोचित सत्कार करुन, पुष्पगुच्छ देवून, मिठाई भरवून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभिष्‍ठचिंतन करण्‍यासाठी दिवसभर मोठी गर्दी झाली होती.

आ. कराड मित्र परिवाराच्या वतीने लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध गावातील १५१ महिला भजनी मंडळांना टाळ, मृदंग, विणा व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर रेणापूर आणि लातूर संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी पाचशे या प्रमाणे एकूण १ हजार विधवा महिलांना साडीचोळीचे वाटप करण्यात आले. रेणापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना ११ हजार १११ वह्यांचे वाटप करण्यात येणार असून प्रातिनिधीक स्वरुपात वह्यांचे वाटप करुन या उपक्रमाचा शुभारंभ जन्मदिनाच्या निमित्ताने करण्यात आला.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अनेक गावागावात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदेवतांचा अभिषेक, महापूजा व आरती करून आ. रमेशअप्पा कराड यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. तर अनेक ठिकाणी सर्वरोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर घेण्यात आले, विविध ठिकाणच्या शिबीरात रक्तदात्यांनी उत्‍स्‍फूर्तपणे रक्तदान केले. अनेक रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले असून रेणापूर तालुका भाजयुमोच्‍या वतीने लातूर येथील जिल्‍हा  शासकीय रुग्‍णालयात रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाईकांना अन्‍नदान करण्‍यात आले.

भाजपा नेते आ. रमेशअप्पा कराड यांना जन्मदिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. धनंजय महाडीक, माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, आ. नितेश राणे, आ. अभिमन्यू पवार, माजी आमदार सुरजितसिंह ठाकुर, भाजपा नेत्या चित्राताई वाघ, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. प्रसाद लाड, आ. राम सातपुते, आ. रणजिसिंह मोहिते पाटील, अरविंद पाटील निलंगेकर, आ. संतोष दानवे, आ. सुभाष देशमुख, आ. माधुरी मिसाळ, भाजपाचे दिलीपराव देशमुख यांच्यासह महाराष्ट्रातील अनेकांनी दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. अभिष्ठचिंतन कार्यक्रम प्रसंगी तुळशीरामअण्णा कराड, काशिरामनाना कराड, सौ. संजिवनीताई कराड, राजेश कराड, ऋशिकेश कराड, पृथ्वीराज कराड, रणवीर कराड यांच्यासह कराड परिवारातील अनेक सदस्य होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले.

    अभिष्ठचिंतन सोहळ्यात आ. रमेशअप्पा कराड यांची भाजपा नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, प्रदिप पाटील खंडापूरकर, माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, अमोल पाटील, शैलेश लाहोटी, विजय क्षिरसागर, महिला आघाडीच्या रागीनी यादव, नवनाथ भोसले, त्र्यंबक गुट्टे, रवि सुडे, भागवत सोट, कुलदिप सुर्यवंशी, हनुमंतबापू नागटिळक, पनगेश्वर कारखान्याचे किशनराव भंडारे, व्यंकटराव अनामे, अॅड. अरुण चव्हाण, काकासाहेब चौगुले, अनिल भिसे, अनंत चव्हाण, मुनोज कराड, महेंद्र गोडभरले, प्रदिप मोरे, सुकेश भंडारे, चंद्रभान जाधव, काकासाहेब मोरे, मंगेश पाटील, बस्वराज रोडगे, प्रकाश पाटील, ऋशिकेश बद्दे, अशोक बिराजदार, सतिश आंबेकर, डॉ. बाबासाहेब घुले, अॅड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, वसंत करमुडे, वैभव सापसोड, पद्माकर चिंचोलकर, विजय काळे, श्रीकृष्ण पवार, गोविंद नरहरे, शरद दरेकर, अॅड. अमित रोडे, श्रीकृष्ण जाधव, सुधाकर गवळी, सुधाकर कराड, विजय गंभिरे, अशोक सावंत, पत्रकार शहाजी पवार, अरूण समुद्रे, बालाजी फड, रामेश्वर बहर, संगम कोटलवार, बापुराव चामले, संतोष तुरुप, श्रीकृष्ण मोटेगावकर, संभाजी वायाळ, सिद्धेश्वर मामडगे, राहूल पाटील, महेंद्र जाधवर, बालाजी दुटाळ, प्रताप पाटील, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, राजकिरण साठे, उमेश बेद्रे, आदीनाथ मुळे, बाबा भिसे, सुरज शिंदे, गंगासिंह कदम, माऊली भिसे, सुरेखा पुरी, ललिता कांबळे, अनुसया फड, लता भोसले, उषा शिंदे, जणाबाई साखरे, उषा रोडगे, शीला आचार्य, श्रीमंत नगारगोजे, अरविंद सुरकुटे, संजय डोंगरे, जगदिश कुलकर्णी, शामसुंदर वाघमारे, अनंत कणसे, विश्वास कावळे, अनंत कोरे, कुलदिप ठाकुर, भैरवनाथ पिसाळ, अॅड. धनराज शिंदे, समाधान कदम, काशिनाथ ढगे, लक्ष्मण नागीमे, वाजीद पटेल, अनवर पटेल, किरण मुंडे, शिवासिंह सिसोदिया, मारोती गालफाडे, शिवमुर्ती उरगुंडे, राजकुमार आलापुरे, किशन क्षिरसागर, अहेमद शेख, अमर चव्हाण, ईश्वर बुलबुले, संजय ठाकूर, बंडु केंद्रे, विशाल कणसे, रमाकांत फुलारी, फुलचंद अंधारे, धनंजय बिक्कड, धनंजय पवार, हरीकृष्ण गुरले, सचिन इगे, श्रुती सवई, योगेश पुदाले, बालाजी पटाडे, रमेश चव्हाण, रशिद पठाण, बालाजी शिंदे, भाऊसाहेब गुळभिले, माधव घुले, सुंदर घुले, जगदीश माळी, वैजनाथ हराळे, विपुल चेपट, अनत सरवदे, संतोष चव्हाण, गोपाळ शेंडगे, चंद्रकांत वांगसकर, धनंजय जाधव, अभिनव वायबसे, विनायक मगर, शंकर चव्हाण, हणमंत गव्हाणे, विजय मलवाडे, सुरेश पाटील, पांडुरंग शिंदे, बालासाहेब कदम, राम बंडापल्ले, गोपाळ पाटील, किशोर काटे, अच्युत कातळे, उत्तम चव्हाण, संतोष राठोड, सुभाष राठोड, अप्पासाहेब पाटील, रामराव कराड, दिलीप चव्हाण, योगेश राठोड, दत्ता अंबेकर, पंकज काळे, सचिन साबदे, नवनाथ माने, पांडूरंग बालवाड, बालाजी गवळी, किरण रोंगे, ज्ञानेश्वर जूगल, पुंडलिक बेंबडे, लक्ष्मण खलंग्रे, दिलीप पाटील, अॅड. पांडूरंग आदुडे, उज्वल कांबळे, नंदकुमार मोटेगावकर, यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी, डॉक्टर्स, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह लातूर एमआयटीचे अधिष्ठाता डॉ. एन.पी. जमादार, शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, उपअधिष्ठाता डॉ. बस्वराज नागोबा, रुग्णालय अधिक्षक डॉ. एकनाथ माले, प्राचार्य सरवनन सर, प्राचार्य होगाडे, डॉ. बबन आडगावकर, डॉ. अरूणकुमार राव, डॉ. महेंद्र बिक्कड, डॉ. सचिन भावठाणकर, डॉ. बस्वराज वारद, डॉ. चंद्रकला पाटील, डॉ. प्रदिप केंद्रे, डॉ. विद्या कांदे, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. सुनिल सगरे, डॉ. सुरेश कांगणे, डॉ. यतिशकुमार जोशी, डॉ. अमोल डोईफोडे, सचिन मुंडे, मधुकर गुट्टे, श्रीपती मुंडे व इतर अधिकारी व कर्मचारी आदी अनेकांनी आ. रमेशअप्पा कराड यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles