लातूर : ज्येष्ठांना मिळाली सायबर अवेअरनेस ची दिशा लातूर जेष्ठ नागरिक संघाचा रोप्य महोत्सव 1मे 2024 ते 1 मे 2025 या कालावधीत होत आहे. रौप्य महोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ व बाबासाहेब परांजपे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल येथे 30 मे रोजी व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर काशिनाथराव सलगर उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून सायबर शाखेच्या प्रमुख पोलीस निरीक्षक नलिनी गावडे ह्या होत्या त्यांच्यासोबत सागर आलापुरे सायबर अवेअरनेस प्रोग्राम या विषयाला धरून ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त अशी माहिती दोघांनीही दिली समाजात कशा प्रकारची फसवणूक होत आहे यावर सविस्तर वृत्तांत दिला सतर्क राहणे विषयी सर्वांना आवाहन करण्यात आले मोबाईलवर आलेले खोटे व फसवणुकीचे मेसेज कसे आहेत त्यामुळे आपल्या खात्यातून पैसा कसा जातो आपली फसवणूक कशी होते अनेक उदाहरण देऊन सर्वांना समजेल अशा भाषेत नलिनी गावडे व सागर आलापुरे यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिली त्यांनी दिलेली माहिती जेष्ठांना दिशा देऊन गेली आहे सायबरच्या माहितीमुळे ते आनंदी झाले आहेत. अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर काशिनाथराव सलगर यांनी नलिनी गावडे व सागर आलापुरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले. भाषणच नाही प्रॅक्टिकल मोबाईलवर काही प्रक्रिया करून दाखविले त्याबद्दल जेष्ठांसाठी उपयुक्त व्याख्यान झाले असे समाधान त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक जेष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगिने यांनी केले. ऑनलाईन फसवणूक जी होते ती किती आवश्यक आहे संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्याने ,आरोग्य शिबिरे ,स्पर्धा ,व फेसकाॕमचे अधिवेशन लातूर येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी ज्येष्ठांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरिता एस .पी. ऑफिसमध्ये भरोसा सेल यात जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन केल्याबद्दल त्यांनी पोलीस खात्याचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर भास्कर बोरगावकर यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष वसंत भेंडे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश भोयरेकर, शहाजी घाडगे, वसंत भेंडे, व प्रकाश घादगिने यांनी परिश्रम घेतले.
