
जळकोट : पंचायत समिती जळकोट येथे कृषी विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बब्रुवान व्यंकटराव पाटील यांनी दिवाळी सणानिमित्त सर्व नागरिकांना सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या मंगलमय सणानिमित्त प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेची नवी ऊर्जा निर्माण होवो. सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि भरभराट नांदो, अशी सदिच्छा बब्रुवान व्यंकटराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे प्रत्येकाचे जीवन उजळून निघावे आणि सर्वांना सुख-समाधान लाभावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.



