रेणापूरच्या विकासाला ५ कोटींचे बळ; आमदार रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नांना यश

0
1

रेणापूर : दि. ५ नोव्हेंबर २०२६

रेणापूर शहरातील विविध विकासकामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भाजपा नेते तथा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेशआप्पा कराड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे या निधीला मंजुरी दिली आहे. निधी मंजूर झाल्याबद्दल नगरपंचायत पदाधिकाऱ्यांसह भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार कराड यांचे आभार व्यक्त केले आहेत.

रेणापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून यापूर्वीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. शहरातील उर्वरित विकासकामांना निधी मिळावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, नगरपंचायत क्षेत्रातील विविध पाच विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोणत्या कामांसाठी किती निधी?

  • व्यापारी संकुल बांधकाम : नगरपंचायत क्षेत्रात व्यापारी संकुल उभारण्यासाठी २ कोटी रुपये.
  • महादेव मठ सभागृह : महादेव मठ येथे सभागृह बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपये.
  • सेवादास नगर स्मशानभूमी : स्मशानभूमी बांधकामासाठी ५० लाख रुपये.
  • रेड्डी समाज स्मशानभूमी : स्मशानभूमी विकसित करण्यासाठी ३० लाख रुपये.
  • सार्वजनिक स्मशानभूमी : विकासकामांसाठी ७० लाख रुपये.

या पाचही कामांसाठी एकूण ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे रेणापूर शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

नगरपंचायत पदाधिकाऱ्यांसह भाजपा कार्यकर्त्यांकडून आभार

रेणापूर शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार रमेशआप्पा कराड यांचे नगराध्यक्ष शोभाताई आकनगिरे, माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, मारूफ आत्तार, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, चंद्रकांत कातळे, सुधीर तोडकरी, श्रीकृष्ण मोटेगावकर, अच्युत कातळे, दिनकर राठोड, उमेश सोमानी, गणेश चव्हाण, शेख अजीम, नागेश बस्तापुरे, दिलीप आकनगिरे, उत्तम चव्हाण, राजकुमार आलापुरे, महेश गाडे, गणेश माळेगावकर, रमेश चव्हाण, धम्मानंद घोडके, संतोष राठोड, अंकुश मोटेगावकर, दिलीप चव्हाण, सोपान सातपुते, संजय वीरुळे, हनुमंत भालेराव, नंदकुमार बडे, शेख सलीम, शेख मकसूद, रफिक शिकलकर, शरद चक्रे, मनोज चक्रे, ज्ञानोबा सातपुते आणि आवेश कुरेशी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here