लातूर ग्रामीण मध्ये क्रांती घडविणारेलोकप्रिय आमदार रमेशअप्पा कराड

0
2

“रामेश्वरच्या मातीत उगवला मानाचा तुरा लातूरच्या मुकुटात शोभला रामेश्वरचा हिरा”

लातूर ग्रामीणच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक इतिहासाने नोंद घेण्यासारखे कार्य करणारे लोकनेते म्हणून रमेशअप्पा कराड यांनी अल्पावधीतच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. जन्‍मापासूनच अध्यात्माचा वारसा लाभलेल्या रामेश्वरच्या कराड घराण्यात रमेशअप्पांचा जन्म झाला. डॉ. विश्वनाथ दा. कराड ऊर्फ अण्णाभाऊ यांच्या सुसंस्कृत, कुटूंबवत्‍सल मार्गदर्शनात अप्पांनी आपल्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवला.

लातूर ग्रामीण मध्ये केवळ राजकारण न करता रमेशअप्पांनी लोकांना संस्काराची समन्वयाची आणि विकासाची एक नवी दिशा दाखवली आहे. कराड घराण्यात राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना रमेशअप्पांनी तो स्वतः निर्माण केला. त्यांचे प्रतिबिंब ऋषिकेश कराड यांच्या रूपाने लातूर ग्रामीणच्या लोकांना अनुभवायला मिळत आहे. आपल्याला मिळालेल्या लोकप्रियतेचा आणि पदाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी न करता जनतेच्या विकासासाठी करणारे एकमेव आमदार म्हणून रमेशअप्पा कराड यांना सर्वत्र ओळखले जाते.

वर्षानुवर्षापासून प्रस्थापित राजकारण्‍यांच्‍या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्‍या लातूर ग्रामीणच्या जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. स्वतःच्या यशापयशाचा विचार न करता आ. रमेशअप्पा कराड यांनी अविरतपणे जनतेच्या सेवेसाठी समर्पण भावनेतून आपले कार्य चालू ठेवले.

विशेषत: पर्यावरण रक्षणासाठी लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून लातूर ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपणासाठी मोठी मोहीम चालू केली स्वखर्चाने वृक्षारोपण केले. लोकांच्या आरोग्य रक्षणासाठी एम.आय.एम.एस.आर. वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालया मार्फत प्रत्येक गावामध्ये आरोग्य शिबिरे घेतली. अध्यात्माच्या माध्यमातून लोकप्रबोधन करण्यासाठी अप्पांनी गावोगावच्या भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप केले. लातूर ग्रामीणच्या अनेक गावांमधील गणेश मंडळांना गणेश मूर्तीचे वाटप केले. आपल्या ग्रामीण मतदारसंघातील कोणत्याही कुटुंबावर कसलेही संकट आले तर आ. रमेशअप्पा कराड संकटग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मागील काळात पुराने उध्वस्त झालेली कुटुंबे, आगीने भस्मसात झालेले अनेक घरे रमेशअप्पांनी स्वखर्चाने उभारली आहेत. आ. रमेशअप्पा हे मतदारसंघातील लोकांना मदत करताना कधी जातीपातीचा विचार करत नाहीत.

लातूर ग्रामीण मतदारसंघातील जनतेच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन रमेशअप्पांनी प्रत्येक गावात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला असून आज प्रत्येक गावात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण सर्व दूरपर्यंत म्हणजे शेवटच्या घरापर्यंत पोहोचले आहे.

आ. रमेशअप्‍पा कराड हे कुशल संघटक असून त्‍यांची प्रशासनावर पकड आहे. लाखो लोकांच्‍या ऱ्हदयातील ते एक ताईत बनले आहेत. कुठल्‍याही जातीपातींचा विचार न करता ते बहूजन समाजासाठी रात्रंदिवस अविरतपणे कार्य करत आहेत.

सतत कार्यरत राहून लोकांच्या समस्यांची सोडवणूक करणाऱ्या आमदार रमेशअप्पा कराड साहेबांना उदंड दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

प्रा. धनंजय दत्‍तात्रय बिक्‍कड

रा. फकराबाद

ता. वाशी जि. धाराशिव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here