संत सावता माळी महाविद्यालयाच्या प्रणिता भंडे, अक्षता साखरे यांचा सत्कार

0
52

दावणगाव : संत सावता माळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. MPSC परीक्षेतून सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून निवड झालेल्या कु. प्रणिता मदन भंडे तसेच MBBS व MD (मेडिसिन) पदवी प्राप्त केलेल्या कु. डॉ. अक्षता प्रकाश साखरे यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष बालाजीराव फुले, सचिव तानाजीराव फुले, तसेच शाळेचे प्राचार्य शिवहार रोडगे उपस्थित होते. प्राचार्य रोडगे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की — “कठीण परिश्रम, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर कोणतेही यश मिळवणे शक्य आहे. या विद्यार्थिनींनी संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे.”

कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये चेअरमन विश्वनाथ भंडे, रमेश भंडे, किशन बिरादार सर, यशवंत ढगे, प्रकाश साखरे, कालिदास भंडे, मनोहर भंडे, विजय पताळे, सोपान महापुरे, बालाजी हुरूसनाळे आणि इलाही पठाण यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे यांनी केले, तर शेवटी आभार प्रदर्शन शफी यांनी मानले.
संपूर्ण कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here