लातूर (प्रतिनिधी) : फ्रेंडस व्हॉलीबॉल क्लब, लातूरचे खेळाडू व पंच शाहेबाज अजमत खान पठाण यांची उत्तरप्रदेशातील बरेली येथे ११ ते १६ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा (१९ वर्षाखालील) या स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती झाली आहे.
या निवडीचे स्वागत महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या पंच मंडळाचे मार्गदर्शक पी. एस. पंत, अध्यक्षा अंजली पाटील, विभागीय सचिव दत्ताभाऊ सोमवंशी, तसेच महेश पाळणे, सय्यद मुजीब, विक्रम पाटील आणि डॉ. लायक पठाण यांनी केले आहे.
शाहेबाज पठाण यांनी यापूर्वीही अनेक शालेय तसेच विविध संघटनांमार्फत आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये अचूक व निष्पक्ष पंचगिरी करून आपले कौशल्य दाखविले आहे. त्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे लातूरच्या व्हॉलीबॉल क्षेत्रात आनंद व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.




