8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त — स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
60

लातूर, दि. 2 नोव्हेंबर — जिल्ह्यात अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्दीत सापळा लावून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत 1 लाख 335 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू तसेच 7 लाख रुपयांची मारुती सुझुकी सियाज कार असा एकूण 8 लाख 335 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात राधेश्याम शत्रुघन जाजू (वय 47, रा. मिलेनियम अपार्टमेंट, रामनगर, जुना औसा रोड, लातूर) याच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार मनोज खोसे, चंद्रकांत डांगे, अर्जुन रजपूत, विनोद चलवाड आणि राजेश कंचे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here