वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा जप्त — 20 लाख 20 हजारांचा मुद्देमाल ताब्यात

0
84


लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर, दि. 23 ऑक्टोबर : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणारा हायवा टिप्परसह एकूण ₹20 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री गरुड चौक परिसरात करण्यात आली. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून टाटा कंपनीचा हायवा टिप्पर (क्रमांक MH 24 AU 3888) ताब्यात घेण्यात आला. वाहनाची तपासणी केल्यावर त्यामध्ये सुमारे 4 ब्रास वाळू (किंमत ₹20,000) आढळली. सदर हायवा टिप्परची किंमत सुमारे ₹20 लाख इतकी असून, एकूण ₹20,20,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात चालक प्रशांत मुरलीधर बंडेवाड (वय 34, रा. कोळवाडी, ता. अहमदपूर) आणि वाहनमालक विजयकुमार पाटील (रा. परचंडा, ता. अहमदपूर) यांच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात शासन परवानगीशिवाय वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक प्रशांत बंडेवाड यास अटक करण्यात आली असून, पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार रामलिंग शिंदे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुराब पठाण व पाराजी पुठेवाड यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here