लातूर (प्रतिनिधी) : दिवाळीच्या उत्साहात संस्कृती, परंपरा आणि आनंदाचा संगम घडवणारा “दिवाळी संध्या” हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम विलास बँक लातूरच्या वतीने बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि त्यांचा “The Rahul Deshpande Collective” चा सुरेल जल्लोष रसिकांसाठी सादर होणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सजवलेल्या या सांस्कृतिक संध्याकाळीत संगीत, परंपरा आणि उत्साहाचा सुरेल संगम अनुभवायला मिळणार आहे. कार्यक्रमस्थळी सायं. ६ वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विलास को-ऑपरेटिव्ह बँक लि. लातूरच्या वतीने विविध ग्राहकसेवा योजनाही उपलब्ध आहेत. ठेवींवर ९.२५ टक्के व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त ०.५० टक्के व्याज, २४x७ एटीएम, POS, ई-कॉम सुविधा, तसेच मोबाईल बँकिंग, यूपीआय सेवा, सोनेतारण कर्ज व इतर आधुनिक बँकिंग सुविधा दिल्या जातात. या ‘दिवाळी संध्या’च्या निमित्ताने विलास बँकेकडून सर्व ग्राहकांना आणि लातूरकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


