सर्वसाधारण उपविजेतेपद; तब्बल 12 पारितोषिके
लातूर : नांदेडच्या स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या “ज्ञानतीर्थ” 2025 आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे सर्वसाधारण उपविजेतेपद लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयास प्राप्त झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि विष्णुपुरी येथील ग्रामीण टेक्निकल आणि मॅनेजमेंट कॅम्पसच्या संयुक्त विद्यमाने दि.12 ते 15 ऑक्टोंबर दरम्यान आंतर महाविद्यालयीन ज्ञानतीर्थ युवक महोत्सव घेण्यात आला. सदरील युवक महोत्सवात दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने यशाची उत्तुंग झेप घेत तब्बल 12 पारितोषिकांसह सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले.
आदिवासी नृत्य (सुवर्ण पदक), रांगोळी (सुवर्ण पदक), वक्तृत्व (सुवर्ण पदक), स्किट/ विडंबन (सुवर्ण पदक), भारतीय समूह गायन (रौप्य पदक),लावणी (रौप्य पदक), पोस्टर पेंटिंग (रौप्य पदक), कलात्मक जुळवणी (रौप्य पदक), उत्कृष्ट एकांकिका (कांस्य पदक),उत्कृष्ट अभिनय पुरुष – गजानन मिश्रा (कांस्य पदक), नक्कल (कांस्य पदक), उत्कृष्ट दिग्दर्शन-सुनील खलुले (कांस्य पदक) अशी तब्बल बारा पारितोषिक प्राप्त करीत आपला दबदबा निर्माण करीत यशाच्या परंपरेत मोलाची भर घातली.
सदरील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, संस्थेचे शैक्षणिक विकास अधिकारी डॉ.जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. गणेश लहाने, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रा. नवलाजी जाधव, सचिन गोणे, विनायक राठोड, संकेत राजपूत, रोहित जाधव, धनंजय वीर, बापू वीर वैभव ठाकूर, आनंद खलुले, राम सावंत, आकाश कुलकर्णी प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. साईनाथ उमाटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. मनीषा अष्टेकर, प्रा. शितल चेरेकर, प्रा. कल्याणी पाटील, प्रा.अजय चव्हाण, प्रा.मेरवान राठोड, प्रा. ऐश्वर्या कुलकर्णी, प्रा. साक्षी पाटील आदींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.




