दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात साजरा

0
93

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचनध्यास’ उपक्रमाचे आयोजन

लातूर, दि. १५ ऑक्टोबर २०२५ – दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूर येथे भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेमध्ये ज्ञान, प्रेरणा आणि वाचन संस्कृतीचा संदेश देणारा ‘वाचनध्यास’ हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एक तास एकाग्रतेने विविध विषयांवरील पुस्तके, चरित्रे, प्रेरणादायी साहित्य आणि संशोधनपर ग्रंथांचे वाचन केले. वाचनातून ज्ञानवृद्धी, विचारांची देवाणघेवाण आणि व्यक्तिमत्त्व विकास साध्य करण्याचा संकल्प या वेळी सर्वांनी व्यक्त केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाजिद चाऊस यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचे स्मरण करून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन केले. “वाचन हे प्रत्येक यशस्वी व्यक्तीचे गुपित आहे. पुस्तक हे आपले सर्वात विश्वासू मित्र आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमात बी. फार्मसी विभागप्रमुख प्रा. अरुण कोंडापूर, डी. फार्मसी विभागप्रमुख प्रा. सुरज मुळजे, प्रा. रोहित उसनाळे, प्रा. प्रतीक चिंचोले, प्रा. तहूरा काझी, ग्रंथपाल शारदा कनामे यांसह सर्व शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविणे, आत्मविकासासाठी पुस्तके वाचण्याची सवय निर्माण करणे आणि ज्ञानवर्धनाची दिशा दाखविणे हा संदेश देण्यात आला. संस्थेच्या वाचनालय विभागाच्या पुढाकाराने आणि प्राचार्यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here