लातूर, दि. ४ (प्रतिनिधी) – शहरात सामाजिक सौहार्द, सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी सद्भावना मंच लातूरच्या वतीने सामाजिक एकतेचे प्रदर्शन आयोजित केले गेले. या कार्यक्रमात सर्व धर्मीय प्रतिनिधी सहभागी झाले असून देशभरात एकतेचा संदेश पोहचविण्यावर भर दिला गेला.
गांधी चौक येथे आयोजित या प्रदर्शनात धर्माधर्मातील वाढत जाणारी तेढ कमी व्हावी, सामाजिक शांतता कायम रहावी आणि धार्मिक सलोखा टिकावा यावर भर देण्यात आला. सहभागी नागरिकांनी हातात “आय लव्ह महादेव”, “आय लव्ह इंडिया”, “आय लव्ह मुहम्मद”, “आय लव्ह संविधान”, “आय लव्ह जिझस”, “आय लव्ह बुध्दा” असे फलक धरून एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमात पप्पूभाई कुलकर्णी, मोईज शेख, प्रभुदास गुप्ते, डॉ. शेहजादी शेख, अफजल कुरेशी, मोहन माने, ॲड. लाला शेख, फादर सुभान रकटे, ॲड. राहूल मातोळकर, ॲड. बळवंत जाधव, अभय मिरजकर, संजय कुलकर्णी, सुभाष भिंगे, जयप्रकाश दगडे, धनंजय भुरके, शिवाजी शिंदे, सुफी सय्यद, अक्षय चवळे, खंडू जगताप, दिपक आपरे, बाळ होळीकर, महेबुब शेख, मनोज आखाडे, कमल शहापुरे, मिना टेकाळे, सायरा पठाण, उंम्मी आयमन, श्रीकांत गायकवाड, रामराजे आञाम, युनुस पटेल, अजीज बागवान, अल्लाबक्ष शेख, सचिन रसाळ, शाम कांबळे, बशीर शेख, अमजद पठाण, रामदास मोहिते, प्रभाकर चौधरी, खदीर खान यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.


