लातूर :– लातूर शहर पूर्व भागातील महादेव नगर , करीम नगर , प्रबुद्ध नगर भागातील नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकित मतदानाचा अधिकार द्या व गरुड चौकातील नेहमी होणाऱ्या जीवघेण्या अपघातावर नियंत्रणा करिता उपाययोजना करा.पोलीस मदत केंद्र सुरू करण्याच्या मागणी करिता नागरिकांच्या वतीने शुक्रवारी गरुड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
लातूर शहर महानगरपालिका पहिल्या महानगरपालिका पालिका सार्वत्रिक निवडणुकीत व तत्कालीन नगर परिषद निवडणूकित मतदान केलेल्या महादेव नगर , प्रबुद्ध नगर , करिन नगर भागातील नागरिकांना लातूर शहर महानगरपालिका २०२५ निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ रचने मधून महादेव नगर, प्रबुद्ध नगर, करीम नगर भागातील नागरिकांना डावलुन त्यांना मतदानाचा अधिकारा पासून वंचित ठेवण्यात आले असून सीमा वादात लगतच्या महाराणा महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकित सुद्धा येथील नागरिकांना मतदान अधिकर न देता मतदान अधिकरा पासून वंचित ठेवण्यात आले आहे दोन्ही पैकी कुठल्याही एका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकित मतदानाचा अधिकार द्यावाया सह लातूर शहरातील गरुड चौकातून गेलेला ३६१ राष्ट्रीय महामार्गातील विकास कामात अनेक त्रुटी मुळे गरुड चौकात रोज शारीरिक अपंगा सह जिवघेणे अपघात होत असल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी, गरुड चौकात पोलीस मदत केंद्राची स्थापना करावी, कृषी महाविद्यालय नांदेड रोडवर सर्विस रोड करून महादेव नगर , करीम नगर , प्रबुद्ध नगर भागातील नागरिकांना रहदाकरीता परांडेकर पेट्रोल पंप समोरील दुभाजकातून मार्ग मोकळा करावा, गरुड चौकाच्या दोन्ही बाजूंनी जास्तीचे दुभाजक कमी करावे, गरुड चौक, सारोळा चौकात गतिरोधक बसवून सिग्नल सुरू करावेत, गरुड चौकात मध्य भागात छोटा गोल वर्तुळ बांधून वायू प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी येथे कारंजे बसवावेत, लातूर शहर महानगरपालिकेने गरुड चौक ते राजीव गांधी चौक मार्गावरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढून गरुड चौकात पोलीस मदत केंद्राकरीत जागा उपलब्ध करुन द्यावी इत्यादी आशयाचे फलक हातात घेऊन ठिय्या मांडत रस्ता रोको आंदोलन सुरू केले.
लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलन कर्त्याना लवकरच तुमच्या मागण्यांवर प्रशासकीय पातळीवर उपाय योजना राबवून उपाययोजना करण्याचे आश्वासन दुपारी रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
या वेळी स्थानिक नागरिक दीपक गंगणे, सामाजिक कार्यकर्ते चंदू बगडे, सचिन चव्हाण , अमोल गायकवाड , उमेश कांबळे,किरण चव्हाण,गौस बाबा शेख,निर्मलाताई कांबळे,सुभाष जाधव , नागेश पवार , भगवेश्वर धनगर, नितीन चिकाटे ,सतिष करंडे , राजू बुये, इंद्रजित गंगणे, सोमनाथ वांजरे,रामहरी गंगणे, विकास सूर्यवंशी , मनोज सौदागर ,अँड धीरज गंगणे, गोविंद भंडारे,बाबासाहेब बनसोडे, नंदकिशोर गंगने, दत्ता मामडे, बाबुराव धनगर, धिरज कश्यप ,रमेश चिलबिले ,हकानी शेख ,बब्रुवान गायकवाड,किरण कसबे,महेश घोडके,खांरुद्दीन शेख ,योगेश गिरी , विनोद गंगणे, आयुब शेख, अनुसया कांबळे,अश्विनी कोथिंबीरे ,छबुबाई कोथिंबीरे ,शारदा सांगावे, कविता कांबळे, वंदना सूर्यवंशी, गयाबाई कांबळे, शबाना शेख ,लता सूर्यवंशी सुवर्णां मंदे ,जनाबाई कांबळे ,अनिसा शेख इत्यादी सह महिला , नागरिक,विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


