साईश्रद्धाच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजारांची मदत

0
129

लातूर : आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचे औचित्य साधून लातूर शहरातील समाजसेवक संजय राजुळे यांनी आपल्या ९ वर्षीय दिव्यांग कन्या कु. साईश्रद्धा हिच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे सुपूर्द केला. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, तसेच महापालिका आयुक्त मानसी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना नागरिकांनी शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केले.


८ वर्षीय अधिराज वागदरेची अनोखी मदत मोहीम

दरम्यान, लातूर शहरातील कातपूर रोडवर राहणाऱ्या ८ वर्षीय अधिराज माधवराव वागदरेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला. शेतकऱ्यांवरील संकटाच्या बातम्या पाहून त्याने गल्लीतल्या नागरिकांना आवाहन केले आणि स्वतः तयार केलेल्या ‘मदत पेटीत’ लोकांकडून निधी संकलित केला.

अधिराजने जमा केलेली रक्कम थेट अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. युनिक इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या अधिराजच्या या उपक्रमाचे कौतुक करत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांनी प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here