‘श्री स्वामी विवेकानंद विद्यालय’चे जिल्हास्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत यश, १७ वर्षांखालील मुलांचा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र

0
213

लातूर (प्रतिनिधी), दि. 11 सप्टेंबर  – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर तसेच शूटिंगबॉल असोसिएशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद विद्यालय, लातूर येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करत जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले.

या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तर १७ वर्षांखालील मुलींचा संघ, १९ वर्षांखालील मुलांचा संघ तसेच १९ वर्षांखालील मुलींचा संघ यांनी द्वितीय क्रमांक पटकावत प्रभावी कामगिरी सादर केली.

विजेत्या संघाचा पुष्पगुच्छ देऊन क्रीडा अधिकारी बाबासाहेब इंगोले, संघटना सचिव श्री. माने, विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच क्रीडा संयोजक अच्युत काळे यांनी सत्कार केला. या यशामध्ये क्रीडा विभाग प्रमुख मुकेश बिराजदार व निलांबरी बिराजदार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्राचार्य गोविंद शिंदे, उपमुख्याध्यापक प्रभाकर सावंत, गणेश कदम, बाळाराम पिचारे, अलका अंकुशे, बालाजी बोकडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here