श्री रोकडे हनुमान युवक गणेश मंडळात रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे भव्य बक्षीस वितरण संपन्न
उदगीर, दि. ९ सप्टेंबर : उदगीर शहरातील प्रतिष्ठित मानाचा गणपती श्री रोकडे हनुमान युवक गणेश मंडळ, कपाळे गल्ली, उदगीर यांच्या वतीने तसेच लोकप्रिय नगरसेवक मा. मनोजअण्णा कपाळे व लॉर्ड बसवेश्वर प्रि-स्कूल व कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
भव्यदिव्य बक्षीस वितरण समारंभ महादेव मंदिर, कपाळे गल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सतीश पाटील मानकीकर, श्री. शिवा डोंगरे, शिवराज कपाळे, अनिताताई हैबतपुरे, सरस्वती चौधरी, कल्याण कपाळे, श्याम कुलकर्णी, डी.एस. बिरादार, पंकज कालानी आदी मान्यवर उपस्थित होते.
बक्षीस वितरणासाठी मदत करणाऱ्यांमध्ये मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद आडे, उपाध्यक्ष विनोद सुरशेटे, कार्याध्यक्ष अमोल कपाळे, तसेच संगम सुरशेट्ये, महादेव पसारे, प्रवीण मुतंगे, रमाकांत वीर कपाळे, महादेव कपाळे, निलेश देशमुख, मन्मथ शेळके, अमोल डोंगरे, अरविंद मुतंगे, नागेश कपाळे, शंकर आवाळे, अजय कपाळे, आशिष बिरादार, प्रवीण कपाळे, अंतेश्वर मुतंगे यांचा सक्रिय सहभाग होता.
महिलांमधून अनिता हैबतपुरे, सरस्वती चौधरी, सुशीलाबाई सुरशेट्टे, निर्मलाबाई कपाळे, सुजाता कपाळे, महानंदाबाई मठपती, शेकाबाई वीरकपाळे, नागमाबाई हलमंडगे, सविता कपाळे, मंगलाबाई मुतंगे, ज्योती सुरशेट्टे, सरुबाई मुतंगे, उषाबाई मुतंगे, कस्तुराबाई पसारे यांच्या योगदानाने कार्यक्रम अधिक यशस्वी झाला.

कार्यक्रमादरम्यान श्याम कुलकर्णी सर यांनी महादेवाची भक्तिगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी परिसरातील नागरिक, लहान मुले व त्यांचे पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
समारोपाला विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.



