लातूर – येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे शिक्षक आणि पत्रकार विनोद चव्हाण यांना सोमवारी इंग्रजी विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पीएचडी प्रदान करण्यात आली.
विनोद चव्हाण यांनी रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली “अ स्टडी ऑफ ऐक्झिस्टन्सीयल क्रायसिस ऑफ विमीन इन द सिलेक्ट प्लेज ऑफ विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड अँड महेश दत्तानी ” यावर त्यांचा प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता.
सोमवारी त्यांचे प्रेझेंटेशन झाले. छत्रपती संभाजीनगर येथील सर सय्यद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुहेल शेख यांनी बाह्य परीक्षक म्हणून काम पाहिले, तर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. डॉ. पी. विठ्ठल परीक्षेचे चेअरमन म्हणून सहभागी होते.
विनोद चव्हाण यांना मिळालेल्या पीएचडी पदवी बद्दल श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरामन लाहोटी, श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग शितोळे, संशोधन मार्गदर्शक डॉ. राजाराम जाधव, वरिष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, डॉ. काका धायगुडे, मुख्याध्यापक बालासाहेब यादव, प्रा सुभाष भिंगे, अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, शरद झरे, प्रा. सुधीर साळुंखे, डॉ. वेदप्रकाश मलवाडे, प्रा. संजय मोरे, प्रवीण शिवनगीकर आदींनी अभिनंदन केले.
