लातूर :महाराष्ट्रातील आघाडीचे संगीत तज्ञ, संस्कार भारतीचे देवगरी प्रांत उपाध्यक्ष दयानंद कला महाविद्यालय येथील संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ .देवेंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ वाशी.नवी मुंबई )यांच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झाले असून संगीत प्रेमींनी त्यांना भरभरून मते देऊन गांधर्व मंडळासाठी एक सुयोग्य उमेदवार देऊन पुन्हा एकदा विजयश्रीची माळ त्यांच्या गळ्यात घातली आहे. गांधर्व मंडळ हे संपूर्ण भारत आणि भारताबाहेर देखील संगीत कलाप्रेमीसाठी कार्य करणारी संस्था आहे, त्यांच्या सोबत त्याच पॅनल मधून सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले असून हा खूप मोठा विजय आहे, त्यांच्या सोबत मराठवाड्यातील श्री बाळासाहेब सूर्यवंशी (गंगाखेड), श्री जनार्दन गुडे (पानगाव), तसेच महाराष्ट्र व इतर राज्यातील उमेदवार निवडून आले आहेत त्यात श्री सुनील हुकिरे (बार्शी), श्री सुधाकर चव्हाण (पुणे), श्री अरुण बोडे (नागपूर), क्षमा गोडसे (पुणे),ज्योती पांचाळ (पनवेल),श्री रामराव नायक (गोवा), निपा ठक्कर (गुजरात), मिलिंद शुक्ल (उजैन), श्री गणेश बरेठ (छत्तीसगढ), श्री जमिनिकांत मिश्र (ओरिसा).
