30.6 C
New York
Sunday, July 6, 2025

समरस समाज व जागृत नागरिक घडवेल विश्वगुरू भारत – सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे

रा.स्व.संघाचे लातुरात ‘विराट शाखा-दर्शन’

लातूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित ‘विराट शाखा दर्शन’ ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार  सायं ५ ते ७ या वेळेत राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची उपस्थिती होती. शहरातील ६१ वस्त्यातील ६३ शाखा एकाच वेळी एकाच मैदानावर उभ्या पहायला मिळाल्या. यात विद्यार्थी, तरुण, व्यवसायिकांच्या शाखांचा समावेश होता. संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असताना, संघाच्या कार्याच्या विस्तारासाठी पंच परिवर्तन या योजनेला महत्व दिलं जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संघाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक हे या आयोजनासाठी तयारी करत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर शहर कार्यवाह किशोर पवार यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महादेव डमणे, देवगिरी प्रांतसंघचालक अनिलजी भालेराव लातूर शहर संघचालक उमाकांत मद्रेवार उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, शाखेमध्ये आल्यामुळे मन, शरीर बुद्धी सदृढ होते, विकास होतो. परिपूर्ण नागरिकाची निर्मिती या एक तासाच्या शाखेतून होत असते. प्रत्येक वस्तीत बालशाखा, तरुण शाखा, प्रौढ शाखा झाल्या पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रात सामाजिक जाणीव असलेले बांधवाना संघ शाखात जोडणे आवश्यक आहे. शताब्दी वर्षात पंच परिवर्तन संकल्पनेवर विशेष भर दिला गेला असून या संकल्पनेत समरसता, नागरिक कर्तव्य, स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या संकल्पनेचा मुख्य उ‌द्देश समाजात एकात्मता आणि समृद्धी घडवणे असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठया संख्येने महिला, नागरिक, व्यापारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles