शिरूर अनंतपाळ : जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. याही वर्षी ०४ ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिरूर अनंतपाळ तालूक्यातील भक्तगण यांनी कांबळगा येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबीरास शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा सरपंच भागवत वंगे यांनी भेट दिली व माऊलींचे दर्शन घेतले व त्यांच्या गावकऱ्यांच्या व कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आले.. याप्रसंगी कमिटीचे प्रोटोकॉल अधिकारी पांडुरंग आलूरे, जिल्हा जनगणना प्रमूख कृष्ण पांचाळ, तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे, तालुका सचिव विशाल सूर्यवंशी, जेष्ठ गुरूबंधू श्रीधर वकील, अशोक जाधव ,तालूका अध्यात्मिक प्रमुख गोविंद ठाकूर ,तालूका ब्लड कॅंप प्रमुख दौलत सावंत, कांबळगा संत्संग सेवा केंद्र अध्यक्ष नामदेव शिंदे,गंगाधर शिंदे, आत्माराम शिंदे, उमाकांत शिंदे, विठ्ठल सूर्यवंशी,गूलाब गायकवाड, धनराज शिंदे, संजय माने आधी पदाधिकारी व गावातील नागरिक व महिला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
