भीमराव कांबळे, अहमदपूर : तालुक्यातील काळेगाव स्थित निसर्गरम्य वातावरणात असलेल्या तक्षशिला बुद्ध विहार, काळेगाव हे लातूर जिल्ह्याबरोबरच आता मराठवाड्यातील बौध्दांच आकर्षण ठरत आहे. अहमदपूर शहरापासून अगदी पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेले हे बुद्ध विहार नांदेड, परभणी, बीड, व लातूर जिल्ह्याच्या सीमेलगत असल्याकारणाने दर पौर्णिमेला या जिल्ह्यातून हजारो उपासक उपासिका या ठिकाणी येत असतात. या बुद्ध विहाराचे भंते महाविरो थेरो यांनी दानातून या ठिकाणी चार एकर माळरानावर हिरवीगार वनराई तयार केल्याने आता या विहाराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. वर्षातील बाराही पौर्णिमेला या ठिकाणी उपासकांना अष्टशील प्रदान केले जाते त्याचबरोबर उपासकांकडून भिकू संघास भोजनदान उपासकांना भोजनदान धम्मदेशना आधी कार्यक्रम या ठिकाणी होत असतात बौद्ध पौर्णिमेस बुद्ध जयंती सोहळा ही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तक्षशिला बुद्ध विहार काळेगाव या ठिकाणी थायलंड देशाच्या भिकू संघाने मागील वर्षी २ मार्च २०२४ रोजी भेट स्वरूपात दिलेली दहा फूट उंचीची बुद्धमूर्ती मुख्य आकर्षण ठरत आहे. या विशाल बुद्धमूर्तीने या विहाराच्या परिसराला खूप मोठं बौध्दांच श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जात आहे. या बुद्ध मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी उपस्थिती दर्शविली होती. २ मार्च २०२४ रोजी हा सोहळा थाटामाटात संपन्न झाला होता. पूज्य भदन्त अतूरलिय रतन महाथेरो हे श्रीलंकेचे माजी खासदार असून राष्ट्रपतीचे धार्मिक सल्लागार म्हणून ओळखले जातात भदन्त अतुरलिय रतन महाथेरो यांनी या भेटीदरम्यान या भागातील बौद्ध समाजातील लोकांचे राहणीमान उद्योग, नोकरी, शेती इत्यादी गोष्टीवर सखोल चर्चा करून शेतीबाबत सेंद्रिय शेती पद्धतीवर भर देण्याचा सल्ला दिला. तक्षशिला बुद्ध विहाराचा परिसर पाहून त्यांना आनंद झाल्याचे यावेळी बोलून दाखवले. भदन्त रतन महाथेरो यांच्यासोबत आलेले भिक्खु पंन्यारतन थेरो, भिक्खू रट्टपाल त्याच बरोबर तक्षशिला बुद्ध विहाराचे भन्ते महाविरो थेरो, श्रामनेर राहुल, श्रामनेर सोनूत्तर यांनी उपस्थित उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले. यावेळी अहमदपूर तालुक्यातील बौद्ध उपासक व उपाशीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
