लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघातील पोहरेगाव येथील 200 कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व नेतृत्वावर विश्वास दाखवित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी सर्वांचे काँग्रेसमध्ये स्वागत करून सर्वांना पक्षकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लोकनेते विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, आमदार धिरज देशमुख यांच्यावर व काँग्रेसच्या विचारावर विश्वास दाखवत रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील २०० कार्यकर्त्यांनी बाभळगाव येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, लालासाहेब चव्हाण, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, गंगासिंह कदम, रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषराव हाके पाटील उपस्थित होते.
यावेळी धिरज देशमुख म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत आहे. पक्षाकडून सर्वांना सन्मानपूर्वक वागवणूक दिली जाईल. आपल्या भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आणि आपल्या भागाचा अपेक्षित विकास करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि एकदिलाने काम करू. प्रत्येक घटकाला सोबत घेऊन समाजाचे प्रश्न मार्गी लावू, असा शब्द देऊन लातूरमध्ये काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी आजपासून कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
