लातूर: मंगळवारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेस डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आले त्यांच्या नामांतर फलकाचा अनावरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर आमदार बाबासाहेब पाटील, वीरमट संस्थांनचे मठाधिपती युवा संत परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, प्रमुख अतीथी म्हणून भाजपाचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके-पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस एडवोकेट भारत चामे, माजी सभापती आयोध्या ताई केंद्रे, ओम शांती केंद्राच्या प्रमुख छाया बहिणजी, माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य एडवोकेट निखिल कासनाळे,न प चे मुख्याधिकारी संतोष लोमटे, भाजपाचे राजाभाऊ मजगे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जीवन मददेवार, अभय मिरकले, अजहर बागवान, प्राचार्य शिवाजी कवलेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, भाजपाचे प्रवक्ते गणेश दादा हाके, एडवोकेट भारत चामे,संयोजक निखिल कासनाळे यांचे मनोगत वर भाषण झाले.
कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रसंताच्या प्रतिमा पूजनाने करून फलकाचे अनावरण आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य शिवाजी कवलेकर, सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार तुकाराम सुरवसे यांनी मांनले.
या कार्यक्रमाला ओम प्रकाश पुणे ,दयासागर शेटे, पांडुरंग मिरकले, शंकराप्पा भालके, वसंतराव शेटकार, डॉक्टर अमृत चिवडे, डॉक्टर ऋषिकेश पाटील, शिवकुमार उटगे, प्रा. विश्वभर स्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
