लातूर : शांतीचे अग्रदूत तथागत भगवान बुद्ध यांचा धम्म मानवी जीवनाला कल्याणकारी आहे. या कल्याणकारी धम्माचे प्राचीन भारतातील प्रसिद्ध राजा सम्राट अशोकाने अनुकरण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजा सम्राट अशोकाचे अनुकरण करीत अशोका विजया दशमी नागपूर मुक्कामी जाहीर बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे धर्मांतर भारतातील रक्तविहीन अशी धम्मक्रांती होय. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर भारतीय इतिहासात ऐतिहासिक क्रांती असल्याचे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी केले आहे.
६८ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिननिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण अनिल कुमार बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले , त्यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर या ठिकाणी भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या हस्ते मुख्य पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून त्रिसरण पंचशील घेण्यात आले.
या प्रसंगी सार्वजनिक जयंती उत्सव समिती चे प्रा. जितेंद्र बनसोडे , रवी गायकवाड,अनंत लांडगे, अनिल बनसोडे, हिराचंद गायकवाड, बापू गायकवाड, विनोद कोल्हे, आनंद सोनवणे, यशपाल कांबळे, राहुल डुमने, राजाभाऊ सूर्यवंशी, अनिरुद्ध बनसोडे, प्रा.डॉ. दुष्यंत कटारे, सुशील चिकटे, लाला बनसोडे, मल्लिकार्जुन करडखेलकर,संजय सोनकांबळे, नवनाथ आल्टे, सचिन गायकवाड, कुमार सोनकांबळे,एम. एम. बलांडे,सुजाता आजनिकर, मंगल कांबळे,मिलिंद धावारे, ई.उपस्थित होते.
