लातूर : महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचालित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील IQAC, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, समाजकार्य आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या अभिमान संपन्न झाले.
युवक व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली, राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय कक्ष, मुंबई यांच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते २ आक्टोबर २०२४ हा पंधरवाडा यावर्षी ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाने राबविण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार महाविद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, ग्रामीण रुग्णालय अशा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणे, प्लास्टिक निर्मूलन करणे या संबंधी कळविण्यात आले आहे.
या मोहिमे अंतर्गत महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृह, सांस्कृतिक सभागृहाचा परिसर, खेळाचे मैदान आणि सर्व परिसर स्वयंसेवकांनी स्वच्छ केला.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यशवंत वळवी, रसायनशास्त्र विभागातील डॉ. जितेंद्र देशमुख, राष्ट्रीय छात्रसेनेचे डॉ. सुजित हंडीबाग, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. मनोहर चपळे, प्रा. किसनाथ कुडके, डॉ. राहूल डोंबे, प्रा. गोविंद पवार आदीची उपस्थिती होती.
या अभियानात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, समाजकार्य आणि क्रीडा विभाग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या अभियानाच्या यशस्वीतेकरिता कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, रंगनाथ लांडगे, गुरुप्रसाद बिराजदार, संगमेश्वर मुळे यांनी परिश्रम घेतले.
