उदगीर :- रविवार 29सप्टेंबर 24 रोजी वीरशैव लिंगायत समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधुवर मेळावा भगीरथ मंगल कार्यालय उदगीर येथे उत्साहात संपन्न झाला.
यात महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणाच्या विविध भागातून शेकडो वधुवर व पालकांनी हजेरी लावली होती.
या लिंगायत महासंघाच्या सहाव्या वधुवर मेळाव्यासाठी औसा हिरेमठ संस्थानचे शांतवीर शिवाचार्य महाराज,लातूरचे खासदार डॉ शिवाजीराव काळगे, लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार,माजी आमदार सुधाकर भालेराव,माजी आमदार मनोहर पटवारी,हावगी स्वामी महाविद्यालयाचे संस्था उपाध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवकुमार हसरगुंडे,परभणी जिल्हा परिषद माजी मुख्यकार्यकारी अधिकारी मल्लिकार्जून करडखेलकर,तसेच इंजि विश्वजीत गायकवाड,युवा उद्योजक स्वप्नील जाधव, शिवाजीराव हुडे,पंचायत समिती सभापती. प्रा शिवाजी मुळे, काँग्रेसचे उदगीर तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टंगेटोल, शहरप्रमुख संतोष पंचाक्षरी, मनसे जिल्हाप्रमुख संजय राठोड,अरुण पाटील,शिभप शिवराज नावंदे गुरूजी , डॉ संतोष बिरादार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात निलंगा अनुभव मंटपच्या महिला व लिंगायत महासंघाच्या अध्यक्ष सौ संगिता भुसनुरे, सरचिटणीस सौ वैशाली व्होनाळे ,यांनी ईष्टलिंगपुजा केली., यावेळी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, कालापाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे,शहराध्यक्ष भिमाशंकर शेळके, जिल्हा उपाध्यक्ष बसवराज ब्याळे,लक्ष्मण रोडगे, शिरिष रोडगे, बापुराव शेटकार संगशेट्टी बिरादार, राजकुमार वडले, अशोक कडोळे,संजय शिवशेट्टे, शिवशंकर पाटील,राजाराम पाटील, कालिदास सिरसे,शांतवीर मुळे,प्रभुराज कप्पीकेरे, प्रा.प्रकाश करेप्पा राजकुमार वडले, जिल्हा संघटक काशिनाथ मोरखंडे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कोरे, गणेश पटणे,चाकुर तालुका अध्यक्ष सुभाष शंकरे संजय पाटील,देवणी शहराध्यक्ष विजयकुमार लुल्ले,धिरज माकणे, निलंगा तालुक्यातील पदाधिकारी तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे सरचिटणीस अशोक काडादी,एन आर स्वामी,व्होनाळे गुरुजी,प्रभाकर डोके, सुर्यकांत पत्रे, धाराशिव जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ जट्टे, यांच्यासह संघटनेचे लातूर ,नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी लिंगायत महासंघाच्या जळकोट तालुकाध्यक्षपदी शंकर धुळशेट्टे, जळकोट तालुका संघटकपदी बालाजी शिवशेट्टे तर कापसे यांची तालुका उपाध्यक्ष तर देवणी तालुकाध्यक्ष म्हणून राजकुमार मुरगे यांची तर जिल्हाउपाध्यक्षपदी शेषेराव मानकरी यांची तसेच शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष म्हणून शिवाजी किडींले यांची निवड प्रा सुदर्शनराव बिरादार यांनी केली.
