उदगीर ला पॅथर चा झंझावात
लातूर – १९७२ च्या काळात स्थापन झालेली पँथर गाव खेड्यातील उपेक्षीत अन्यायग्रस्त पिडीतांच्या मदतीला ज्या प्रकारे धाऊन जायची यामुळे उपेक्षितांना लढण्याचे बळ मिळायचे. रिपब्लिकन ऐक्यानंतर पँथरचा तो झंजावात थांबला होता. तो पुन्हा एकदा पुनरुज्जीवीत होऊन नव्या जोमाने नव्या ताकतीने उभा रहात आहे या सामाजिक संघटनेच्या कार्याच्या विरोध करणाऱ्या सत्ताधारी आणि राजकिय पुढाऱ्यांना वटणीवर आणणार असल्याने प्रतिपादन महाराष्ट्राच्या भा.द. पॅंथरचे कार्याध्यक्ष संजयभाऊ कांबळे यांनी उदगीर येथे संपन्न झालेल्या बैठकित पॅथर कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना केले त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीचे मार्गदर्शक प्रा बालाजी आचार्य होते तर सुनिल क्षिरसागर धम्मानद घोडके , गौतम सोनकांबळे , त्रिशरण मोहगांवकर , सतिश वाघमारे , निवृती भाटकुळे , प्रतिक कांबळे धम्मपाल सावंत ,राहुल कांबळे , अनिल कांबळे , प्रविण आल्टे आदि ची उपस्थिती होती यावेळी या बैठकीचे प्रस्ताविक भागवत तलवारे यांनी केले त्यानंतर पुढे बोलताना कांबळे म्हणाले की
मागासवर्गीयाच्या आरक्षणावर घाला घातला जात असताना , दलीतांबरील अत्याचारात वाढ होत असताना पुन्हा एकदा पँथर जिवंत करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन पँथर रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वात आम्ही पँथर गावागावातील तरुण कार्यकर्त्यापर्यंत पोहचवून जागृत करण्याचे काम करत आहोत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर , उदगीर, चाकूर निलंगा औसा रेणापूर तालुक्यातील तरूणांनी जोमाने कामाला सुरुवात करून तेवढयाच ताकदीने पँथर उभा रहात आहे. रविवार उदगीर तालुक्यात पँथरची बैठक पँथरच्या पुनरुज्जीवित होण्याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणता येईल.उदगीर शहरात पॅंथर राजू कांबळे दावणगावकर यांनी बैठकीचे आयोजन करून पॅंथरला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेतला यावेळी मार्गदर्शन करताना प्रा बालाजी आचार्य यांनी पॅंथर चळवळीचा इतिहास सांगून सद्यस्थितीत शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय हक्क अबाधित ठेवण्यासाठी सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष अटळ असल्याचे सांगितले आणि ब्र नव्या उमेदिने संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले मोठ्या संख्येने पॅथर कार्येकर्ते उपस्थित होते

