अहमदपूर – सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्याची व्यापक बैठक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगवीकर यांच्या अध्यक्षतेखाली 22 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय शासकीय विश्रामगृहात होऊन त्यात सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते ॲड. अजिंक्य भारत चामे यांची तर सचिव पदी सतीश उर्फ पिंटू सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष जयराज तेलंग, वैभव बल्लोरे, सहसचिव ऋषिकेश गुट्टे, कोषाध्यक्ष योगेश शेटकार यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून बालाजी काडवादे, गंगाधर सूर्यवंशी, अमर पाटील, अक्षय कदम, रवी कदम, संतोष निटूरे, रोहन कंधारकर, पद्माकर पेंढारकर, पांडुरंग लोकरे यांची सर्वांनू मते निवड करण्यात आली.
या बैठकीला माजी आमदार रामभाऊ गुंडिले, मार्गदर्शक ओम भाऊ पुणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, माधव पुणे, पापा आय्या, अभय मिरकले, रवी महाजन, जुगल किशोर शर्मा, सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, विकास महाजन,राजकुमार कल्याणे, दत्ता गोरे, दयानंद पाटील, राजू गाढवे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकुमार उटगे यांनी सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार गोविंद गिरी यांनी तर गेल्या वर्षीच्या अहवालाचे वाचन माजीअध्यक्ष सुभाष गुंडिले यांनी केले .
यावेळी माजी आमदार रामभाऊ गुंडिले, ओम भाऊ पुणे, माधव पुणे यांचे मनोगत पर भाषणे झाली. मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन करण्यात आला.
