लातूर: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय “आधारस्तंभ” पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यातील प्रकाश घादगीने व रमेश माने यांची निवड झाली आहे
गेल्या अनेक वर्षापासूनप्रकाश घादगीने व रमेश माने हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते असून ते सध्या राज्यस्तरावर राज्य कार्यकारी सदस्य व प्रशिक्षण विभागावर काम करतात.


लातूर जिल्ह्यातल्या व राज्यभरातल्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केलेले आहे तसेच समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाढीसाठी ही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांची या वर्षीच्या आधारस्तंभ पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. सदरील पुरस्कार १४ व १५ सप्टेंबर रोजी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर जिल्हा रायगड येथे जेष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत या कार्यक्रमासाठी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार अलोक देशपांडे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात ॲड. मुक्ता दाभोळकर हे उपस्थित राहणार आहेत हा पुरस्कार मिळाल्याने प्रकाश घादगीने व रमेश माने यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.