26.2 C
New York
Sunday, July 6, 2025

स्वर सुमनाने पंडित चिगरी गुरुजींना अभिवादन

सरस्वती बोरगावकर यांचे सुश्राव्य गायन

लातूर : पं.शांताराम चिगरी गुरुजी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त सुरताल संगीत महाविद्यालय व शिष्य परिवाराच्या वतीने सूरताल संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेची सुरुवात सुमित्रा शांताराम चिगरी, माधवराव पाटील टाकळीकर ,प्रा. शिवराज मोटेगावकर , तुकाराम पाटील, निलेश राजमाने आणि , शशिकांत पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी माधवराव पाटील टाकळीकर यांनी बोलत असताना ” चिगरी गुरुजीमुळे लातूरला शास्त्रीय संगीतांची ओळख झाली ” असे मत व्यक्त केले. तर तालमणी डॉ.राम बोरगावकर यांनी गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला .गुरुजींचे शिष्य सोनू डगवाले यांनी प्रस्ताविक करून गुरुजींच्या सांगीतिक योगदानाची व कार्याची सविस्तर माहिती दिली.
गायिका सरस्वती बोरगावकर यांनी आपल्या गाण्याची सुरुवात ही राग बैरागी यांनी केली .या रागामध्ये विलंबित एकताल मध्ये ” मेरे मन मे बसो राम अभिराम ” हा बडाख्याल सादर केला . त्याचप्रमाणे ताल त्रिताल मध्ये ” सुरसे सादरे रसिक सूर ” ही छोटा ख्याल मधील बंदिश सादर केले. त्याचप्रमाणे ” याद पिया की आये ” ही ठुमरी सादर करून अनेक नाट्यगीत व भजन असे सुश्राव्य असे सादरीकरण केले. त्यांना समर्पक हार्मोनियम साथ सुरमनी बाबुराव बोरगावकर यांनी दिली तर तबला साथ संजय सुवर्णकार यांनी केली व तानपुरा साथ शिवाजी कंदगुळे यांनी केले
या कार्यक्रमासाठी लातूरमधील पं. राम बोरगावकर , पं. शिवरुद्र स्वामी , प्राचार्य डॉ. संजय गवई पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे , वेदांग धाराशिवे प्रा. गणेश बोरगावकर, ताल मार्तंड प्रकाश बोरगावकर , नायब तहसीलदार गायकवाड साहेब, कवी योगीराज माने प्रा. फासके सर प्रा. मनोहर कबाडे सर प्रा. शशिकांत देशमुख प्रा. विजयकुमार धायगुडे प्रा. शैलेश कानडे ,सौ. बोरगावकर मॅडम व गणेश सुतार ही कलाकार वर रसिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरताल परिवारातील श्री .सोनू डगवाले डॉ. संदीप जगदाळे, संजय सुवर्णकार, अमर कडतने ,व्यंकट काळे , शिवाजी कंदगोळे व प्रा. परमेश्वर पाटील यांनी प्रयत्न केले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles