धनेगाव येथे आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा:
लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त धनेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दगडूजी अण्णा साळुंके (विधानसभा प्रमुख निलंगा चेअरमन ) , श्री माणिकराव डोके साहेब (पोलीस निरीक्षक), ईश्वर मुर्के (ग्रामसेवक), सरपंच पती हरी परीट , प्राचार्य रामलिंग मुळे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक अनिल काशिनाथ बिरादार व पांडुरंग श्रीरंग बिरादार विनायक अलमले, पोलीस पाटील बंकट बोयने यांच्या हस्ते श्री महादेव माध्यमिक विद्यालयातील 55 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दहावी व बारावी , सारथी शिष्यवृत्तीधारक, बारावी NEET , व jEE परीक्षेत यश संपादन करणाऱ्या ,पाचवी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी ,यांचा सत्कार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा सत्कार ,गणित विषयात शंभर पैकी 99 गुण घेणारे सय्यद अक्सा, व प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी बक्षीस व शाल फेटा बांधून सत्कार करण्यात आला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर व सेवादास नगर तांडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणुन वह्या, पेन देण्यात आले, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनेगाव चे माजी सरपंच कुमारजी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन अमर बिरादार यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव बिरादार, दयानंद खारे,खंडू राठोड,ज्ञानोबा बिरादार,अमरदीप बिरादार , अजिंक्य बिरादार,अमित बिरादार ,सचिन सांडवे, पंकज बिरादार,वसंत पाटील, बजरंग खारे संचालक, अप्पा खारे, ज्ञान राठोड व सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले…