हेर – उदगीर तालुक्यातील हेर येथे देवर्जन जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या उषाताई शंकर रोडगे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या देवर्जन जिल्हा परिषद गटातून १९४६ मताची लीड भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास दिल्यामुळे त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी हेरचे उपसरपंच तुळशीराम बेंबडे, तंटामुक्ती माजी अध्यक्ष राजकुमार तवंडे, आदर्श शेतकरी बाबासाहेब पाटील, माजी चेअरमन दिलीप बिरादार, माजी व्हाईस चेअरमन रेवण मळभागे, भारतीय जनता पक्षाचे हेर शाखेचे माजी अध्यक्ष बालाजी गुराळे, केशव कांबळे, सतीश फड, रामेश्वर कदम, प्रकाश नादरगे, डॉ. संजय सांडोळकर, मनोज तवंडे, सुदर्शन मुंडे आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना माजी जिल्हा परिषद सदस्या उषाताई रोडगे म्हणाल्या की, माजी खासदार सुधाकर शृंगारे पराभूत झाले ही खंत आहेच पण अशा परिस्थितीतही देवर्जन जिल्हा परिषद व हेर पंचायत समिती गण आणि गटातून चांगले मताधिक्य मिळवून दिले. तसेच भारतीय जनता पार्टीने मला जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीच्या माध्यमातून मी देवर्जन जिल्हा परिषद सर्कलमधील प्रत्येक गावामध्ये अनेक विकासाची कामे केली. तसेच भविष्यातही असेच काम करेन. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कदम यांनी केले तर आभार सुदर्शन मुंडे यांनी मांनले. यावेळी हेर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
