20.3 C
New York
Sunday, July 6, 2025

रामवाडी, कारेपूर येथे प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या विकासनिधी मंजूर

लातूर : लातूर ग्रामीण मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत अत्यंत चांगले मनापासून काम केले असून या पुढील काळात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतही गावागावातील भाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विचाराने आणि जिद्दीने काम करून भाजपाचे मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

         भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील मौजे रामवाडी ख. येथील ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी दहा लाखाचा आणि मौजे कारेपूर येथील हनुमान मंदिर परिसरात सभा मंडप बांधकामासाठी दहा लाखाचा निधी आपल्या स्थानिक आमदार निधीतून मंजूर केला. सदरील निधी मंजूर केल्याबद्दल दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी बुधवारी दुपारी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात आ. कराड यांचा यथोचित सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, रेणापूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे आणि किसान मोर्चाचे साहेबराव मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          रामवाडी आणि कारेपूर येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, रामवाडी हे गाव पूर्वीपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे तर कारेपूर येथील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत अटीतटीची लढत असतानाही मनापासून काम केले आणि भाजपाला चांगले मताधिक्य मिळवून दिले. त्याबद्दल दोन्ही गावच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून येणाऱ्या काळात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विचाराने मन लावून जबाबदारीने काम केल्यास शंभर टक्के यश मिळते यात शंका नाही असे बोलून दाखविले.

          भाजपाचे प्रमुख कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे, गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हावे त्याचबरोबर ग्रामस्थांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक कामाकडे लक्ष द्यावे अशी सूचनाही यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड यांनी केली.

         यावेळी रामवाडी येथील सरपंच पांडुरंग कलूरे, उपसरपंच करण सुरवसे, शालिकराम गोडभरले, भूषण उगले, नामदेव गोडभरले, गणपती कोलपाक, भीमराव दिवटे, सूर्यकांत सुरवसे संजय गोडभरले, पुंडलिक दिवटे, ज्ञानेश्वर गोडभरले, नितीन गोडभरले, मधुकर गोडभरले आणि कारेपूर येथील भाजपाचे भाऊसाहेब गुलबिले, माजी सरपंच दगडू महाराज पुरी, माजी सरपंच राजेश काळे, ओमकारआप्पा क्षीरसागर, शंकर माने, चांद शेख, धोंडीराम ठोंबरे, ऋषिकेश गायकवाड, माणिक सुरवसे, प्रकाश साळवे, सुरज पल्ले, ओम चव्हाण, बाबासाहेब साळवे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles