27.5 C
New York
Monday, July 7, 2025

डॉ. रेड्डी यांच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण पुस्तकाचे आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते प्रकाशन

लातूर : वैद्यकीय अभ्यास क्रमात झालेल्या बदलाला अनुसरून लातूर एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. आनंद रेड्डी यांच्या शरीररचना शास्त्रात या नावीन्यपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन भाजपा नेते तथा कार्यकारी संचालक आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते शनिवारी प्रकाशन करण्यात आले. अशा प्रकारचे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पहिलेच पुस्तक आहे. हे पुस्तक एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांबरोबरच डेंटल, आयुर्वेदिक तसेच फिजिओथेरपीच्या पदवी व पदवीत्युत्तर विद्यार्थ्यांना हे उपयुक्त ठरणारे आहे.
लातूर येथील एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयात शरीर रचना शास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ आनंद जगन्नाथ रेड्डी यांनी शरीररचनाशास्त्रात एक नावीन्यपूर्ण पुस्तक लिहिले आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाची असलेल्या Elsevier कंपनीने सदरील पुस्तक प्रकाशित केले आहे. पदवी व पदवीत्युत्तर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे पुस्तकाचे प्रकाशन भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्याहस्ते झाले. यावेळी एमआटी वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, उपअधिष्ठिता डॉ बी एस नागोबा, शैक्षणिक व प्रशासकीय संचालक डॉ सरिता मंत्री, लेखक डाॅ आनंद रेड्डी, डाॅ मुकुंद भिसे, डॉ सचिन भावठाणकर, डाॅ पठाण, डॉ महेश उगले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे पुणे येथून 2004 मध्ये एमबीबीएस पदवी घेवून भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, पुणे येथून 2011 मध्ये एमडी (शरीर रचना शास्त्र ) शिक्षण पूर्ण केल्यानंतर डाॅ आनंद रेड्डी हे जुलै 2012 पासून एम आय टी मेडिकल कॉलेज मध्ये शरीर रचना शास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण गोष्टींचा (बोन बँक) अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
2019 साली राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय क्षेत्रात आमूलग्र बदल करून CBME ( क्षमता अधिष्ठित वैद्यकीय शिक्षण) ही नवी शिक्षणप्रणाली अस्तित्वात आणली. अभ्यास क्रमाच्या अगदी सुरुवातीपासून विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करणे, त्यांचे गुणवत्तापूर्ण मूल्य मापन करणे, मूल्यवर्धित शिक्षण देणे इत्यादी बाबीवर आधारित ही शिक्षण प्रणाली आहे.
वैद्यकीय अभ्यास क्रमात झालेल्या या सर्व नवीन बदलाला अनुसरून डॉ आनंद जगन्नाथ रेड्डी यांनी शरीररचनाशास्त्रात एक नावीन्यपूर्ण पुस्तक लिहिले आहे. अशा प्रकारचे वैद्यकीय शिक्षणक्षेत्रातील पहिलेच पुस्तक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles