लातूर : येथील साने गुरुजी शैक्षणिक संकुलातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीतील गुणवंत म्हणजेच 90% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार शनिवारी विद्यालयाच्या विलासराव देशमुख सभागृहात संस्था सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेचे संस्थापक अध्यक्ष कालिदास माने यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपस्तंभ गुरुकुल व कोचिंग क्लासेसचे संचालक सुवेद सूर्यवंशी, स्व. ज्ञानदेवराव माने (DM) ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य शरद चव्हाण, नंदादीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास राऊत तसेच शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल शेख आदि उपस्थित होते.
मार्च-2024 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाचा निकाल 100 % लागला असून, 98.00% गुणासह राडकर गौरव संजय प्रथम, 97.60% गुणांसह
घोरपडे अमित विठ्ठल द्वितीय तर 97.40% गुणांसह शेख अलिशा ने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या प्रसंगी वरील गुणवंत विद्यार्थ्यासोबत घुटे यश (95.00%), गुडले आदित्य राम (95.00%,) हिंगमिरे साईप्रसाद मन्मथ (93.00%,) काळे श्रेया मारोती (93.00%), भले आदित्य अरुण (92.60%), सूर्यवंशी वैष्णवी दुष्यंत (92.40%), कोथिंबीरे शंतनू ज्ञानेश्वर (92.20%), बोरकर ज्ञानेश्वर नवनाथ (92.00%), जाधव कृष्णा हरी (91.80%), शेळके प्रगती नागनाथ (91.40%), वडजे शिवराज यशवंत (91.20%), गोडबोले मनीष बाबासाहेब (90.80%), लोणे अथर्व तुकाराम (90.40%), स्वामी अमृता विजयकुमार (90.40%), आगवाने आदित्य नामदेव (90.20) आदि विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कावळे स्मिता, परळे गणेश, धोत्रे वैभव, गायकवाड राहुल, माने सचिन, कोयले हरिदास, जगताप शिवगंगा, काळगापुरे कमल, यादव मिनाक्षी, पवार शशिकांत, डोनगावे कोमल, गायकवाड सतीश, पवार अमोल, पाटील सुनंदा, वडवळे नवनाथ, दयानंद लहाडे, बनसोडे पोर्णिमा आदि शिक्षक तथा सावंत बालाजी, सुडे दत्तात्रय, पांचाळ सुर्यकांत हे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन सहशिक्षक गणेश परळे यांनी तर आभार वैभव धोत्रे यांनी मानले.
