मुरुड : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुरूड ग्रामपंचायत कार्यालयासमोर भगवा ध्वज गुढी उभारण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी मुरुडचे उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक, ग्रामपंचायत सदस्य अनंत कणसे, बीजेपी शहराध्यक्ष गणेश चव्हाण, प्रतिष्ठित नागरिक धनंजय भोरकर तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते सर्वांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

