लातूर – लातुरात ३५० वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच नुतन खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनीही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याप्रसंगी शिवजन्मोत्सव समिती लातूरचे डॉ. हर्षवर्धन राऊत, ॲड उदय गवारे, डॉ संजय पौळ, हंसराज जाधव, प्रवीण साळुंके, संभाजी सुळ, निलेश राजेमाने, धनंजय शेळके, ॲड शिवकुमार जाधव, संजय सावंत ,प्रा.दत्ता सोमवंशी आदी उपस्थित होते.
