लातूर : लातूर शहर महानगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडे वसुलीसाठी विशेष वसुली मोहिम सुरु करण्यात आली आहे. सदर वसुली मोहिमे अंतर्गत २९/०५/२०२४ रोजी दुस-या दिवशी गाळे धारकांवर धडक कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कार्यवाहीमध्ये २३ गाळे सील केले आहे. व एकूण रक्क्म रु ९,३०,३९९ रु वसुल करण्यात आले.
लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या गांधी चौक व्यापारी संकुल येथील ०१ गाळा सील करण्यात आला तसेच रिगल सिनेमा समोरील व्यापारी संकुल येथील १२ गाळे सील करण्यात आले आहे. व गंजगोलाई व्यापारी संकुल येथील ०१ गाळा सील करण्यात आला. तसेच गांधी मैदान सा.क्रं. १११ व ११२ व्यांपारी संकुल येथील ०३ गाळे सील करण्यात आले व चार लाख रु चेकव्दारे वसुली करण्यात आली आहे. व गांधी चौक पाण्याची टाकी व्यापारी संकुल येथील ०६ गाळे सिल करण्यात आले.
लातूर शहरातील मनपा मालकीच्या गाळे धारकांना उपायुक्त, डॉ.पंजाब खानसोळे यांच्याव्दारे आवाहन करण्यात येते की ज्या गाळे धारकांकडे थकबाकी आहे अशा गाळे धारकांनी तात्का्ळ थकबाकीचा भरणा करुन मनपास सहकार्य करावे. व गाळे धारकांनी थकबाकी भरणा न केल्यास अशा गाळे धारकांवर अशीच कार्यवाही सुरु रहाणार आहे