30.6 C
New York
Sunday, July 6, 2025

पनवेल महानगरपालिकेसाठी विविध संवर्गासाठी परीक्षा संपन्न ; लातूर केंद्रातून १०७१ उमेदवारांनी दिली परीक्षा

लातूर दि.8 – पनवेल महानगरपालिका आस्थापनेवरील गट “अ” ते गट “ड” मधील ४१ संवर्गातील ३७७ पदांकरीता राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर एकुण ५५,२१४ एवढे उमेदवार परीक्षेसाठी बसले होते. लातूर केंद्रावरून १०७१ एवढ्या उमेदवारांनी दिली. ही परीक्षा टि.सी.एस कंपनीमार्फत घेण्यात येत आहे.
आज दि.०८/१२/२०२३ रोजी लातूर जिल्हयातील 2 परीक्षा केंद्रावर एकूण दोन तीन सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती, पहिले सत्र स. ९.०० ते ११.००, दूसरे सत्र दु.१.०० ते ३.०० व तिसरे सत्र सायं. ५.०० ते ७.०० अशा स्वरुपात परीक्षा पार पडली, या परीक्षेमध्ये एकूण १०७१ एवढ्या उमेदवारांनी सहभाग घेतला होता.
परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अधिकारी, एक लिपिक व एक शिपाई नियुक्त करण्यात आला होता. तसेच परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता या केंद्रा वर दोन पुरुष कॉन्स्टेबल व दोन महिला कॉन्स्टेबल असे एकूण ४ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते.
परिक्षा केंद्रावर उमेदवारांनी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा तसेच मोबाईलचा वापर करु नये याबाबत योग्य ती दक्ष घेणेकरीता, शासन मान्यता प्राप्त मे. ई. सी. आय. एल. (ECIL) या कंपनीची प्रत्येक परिक्षा केंद्रावर जॅमर बसविण्यात आलेले होते.
परिक्षेकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकारी/ कर्मचारी वर्ग यांनी अपार मेहनत घेतली असून त्यास पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभले आणि त्यामुळेच परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही व परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली आहे. अशी माहिती जिल्हा समन्वयक तथा जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles