लातूर- महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थमराठवाडा विद्यापीठ, नांदेड वसहयोग शिक्षणशास्त्र महाविद्यालय,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 21 ऑक्टोंबर 2024 यादरम्यान आयोजित ज्ञानतीर्थ युवक महोत्सव 2024 मध्ये पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसश्वेर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे होते तर प्रमुख अतिथी शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील मिटकरी, ज्येष्ठ संचालक बाबूराव तरगुडे, संचालक राजेश्वर बुके, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षिका प्रा.वनिता पाटील, IQAC समन्वयक डॉ. आनंद शेवाळे, वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. विजयकुमार सोनी, पदव्युत्तर विभागसमन्वयक डॉ.यशवंत वळवी ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे ,संघ व्यवस्थापक डॉ. मनोहर चपळे आदीची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यातआले आणि संगीत विभागातील प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा.गोविंदपवार व विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.कार्यक्रमाप्रसंगी विविध कलाप्रकारात नैपुण्य मिळवणाऱ्या कलावंतांचा यथोचित गौरव करण्यात आला.या युवक महोत्सवात कथाकथन या कलाप्रकारात महाविद्यालयाची विद्यार्थिनी शिवाली मुकडे हीचा सुवर्णपदकासह विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळाला. लावणी या कलाप्रकारात वैष्णवी स्वामी सर्वतृतीय समूहगीत पाश्चात्य सर्वतृतीय सहभागी विद्यार्थी आगलावे मिताली, सूर्यवंशी साक्षी, पांचाळ भक्ती, निर्मळ सानिया, सेलूकर सिद्धी, स्वामी स्वाती लोकसंगीत आर्केस्ट्रा सर्वतृतीय सहभागीविद्यार्थी शिंदे गणेश, कुंभार रोहित, पांचाळ कैवल्य, दाडगे तुकाराम, येवणगे विजय, शेलार अजय, पांचाळ , विकास, आगलावे मिताली, पांचाळ भक्ती, लोकनृत्य या कलाप्रकारात सर्वतृतीय सहभागी कलावंत कार्तिक रसाळ ,नेहा गायकवाड, समृद्धी शिंदे ,वैष्णवी स्वामी, सुनील कोल्हे, सानिया निर्मळ, अनिकेत राऊत, शीतल चव्हाण, ज्ञानेश्वर, वाघमारे साईनाथ स्वामी विडंबन या कलाप्रकारात सर्वतृतीय सहभागी कलावंत भुरे सत्यम, वाघमारे ज्ञानेश्वर, मस्के वैभव, स्वामी वैष्णवी या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे,सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील आप्पा मिटकरी, राजेश्वर बुके, बाबूराव तरगुडे यांच्या शाल, ग्रंथ पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.या सर्व कलाप्रकारात प्रशिक्षण देणारे प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा. गोविंदपवार , धम्मपाल सकपाळ, प्रवीणकसबे, डॉ. अश्विनी रोडे, डॉ.राहूल डोंबे, प्रा.सरस्वती बोरगावकर यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित यशवंतांचे पालक नातेवाईक यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, संगीतही विश्वाची भाषा असून संगीत ही मनामनाला, व्यक्ति व्यक्तिला जोडणारी कला आहे. कलावंत आपल्या आनंदाबरोबर कलेच्या माध्यमातून दुसऱ्यालाही आनंदित करत असतो असे ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय समारोपात आदिनाथ सांगवे म्हणाले की, कलाही सौंदर्याचा उत्कट आविष्कार असते यातून आपल्या भावभावना व्यक्त होत असतात. रंग, रेषा,स्वर, ताल यातून व्यक्ती अभिव्यक्त होत असतो.कलावंताची कला हीसमाजाचा गौरव वाढवणारी गोष्ट असते. त्यामुळेकला आणि कलावंतयांचा सन्मान समाजातल्या प्रत्येक घटकांनी करावा असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.रत्नाकर बेडगे यांनी केले. मनोगत प्राचार्य डॉ.संजय गवई यांनी मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अश्विनी रोडे, डॉ. राहूल डोंबे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. मनोहर चपळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. नागेश जाधव,प्रा .व्यंकट दुडिले,प्रा. डॉ.गीता गिरवलकर, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, बालाजी डावकरे, बालाजी होनराव, संदीप मोरे, शुभम बिराजदार, नंदू काजापुरे आदींनी परिश्रम घेतले.
