लातूर : शहरातील पूर्व भागात असलेल्या रिंग रोडवरील नांदेड रोड जाणाऱ्या चौरस्त्यावर शिवरत्न जीवा महाले चौक म्हणजेच (गरुड चौक) येथे शिवरत्न जीवाजी महाले यांच्या 389 वी जयंती आज 09 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जीवा महाले चौक रिंग रोड नांदेड रोडवरील जुन्या गरुड चौक येथील साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने शिवरत्न जीवाजी महाले यांच्या 389 व्या जयंतीनिमित्त नांदेड
रोडवर शिवरत्न जीवाजी महाले यांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढून गुलाल उधळ त्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लातूर शहर महानगरपालिका माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नाभिक समाजाचे नेते बालाजी गवळी, भाजपा महिला नेत्या निर्मलताई कांबळे, लातूर शहर पूर्व भाग कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे यांच्या उपस्थितीत माजी महापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते शिवरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतीमेचे पूजन करून शिवरत्न जिवाजी महाले की जय घोषणाबाजी देते शिवरत्न जिवाजी महाले चौकात शिवरत्न जीवाजी महाले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीचे सचिव बाबासाहेब बनसोडे, नितीन चालक, गौतम ससाणे, मुनावर शेख, साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश बगडे, नंदकिशोर गंगणे, नितीन दळवी, गणेश श्रीमंगले , सिद्धेश्वर गवळी, धीरज कश्यप, अजय गवळी, सुरेश संगापुडे, सदाशिव चाफेकर, अजय बिराजदार, प्रदिप बेबंडे,दत्ता ममदे,कृष्णा कसबे अदिंसह इतर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
