अहमदपूर : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा MTS परीक्षेत यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात मठपती अक्षरा महालिंग (राज्यात दहावी), कांबळे श्रुती बापूराव (राज्यात बारावी), शेंबाळे प्रज्वल दत्तानंद (राज्यात 17 वा) यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार मुख्याध्यापक जी आर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांना सहशिक्षक के डी बिरादार, बापूराव कांबळे, राघवेंद्र बोराळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे टागोर शिक्षण समितीचे सचिव डी बी लोहारे गुरुजी, अध्यक्ष डॉ अशोक सांगवीकर, उपाध्यक्ष डॉ भालचंद्र पैकै, सहसचिव प्रा डॉ सुनिताताई चवळे, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेद्येवाड, राम तत्तापूरे यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
