17.2 C
New York
Saturday, July 5, 2025

डॉ. राजेश इंगोले म्हणजे भाग्यशाली व्यक्तिमत्व – सोनू डगवाले

अंबाजोगाई : पत्रकार व कलावंतांच्या पुढाकाराने डॉ राजेश इंगोले यांचा सत्कार होतोय म्हणजे हे एक भाग्य शाली व्यक्तिमत्व आहे असे उदगार दिशा प्रतिष्ठान लातूरचे अध्यक्ष श्री सोनू डगवाले यांनी काढले.
मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई व मनोहरी अंबानगरी कलाकार कट्टा यांच्या वतीने सिफा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमी नोंद झाल्याबद्दल व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंबाजोगाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले यांच्या गौरव समारंभा निमित्य आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोनूजी डगवाले हे बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ श्रीनिवास रेड्डी, प्रा ईश्वर मुंडे, ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष सय्यद सर, अंबाजोगाई तालुका वैद्यकीय अधिकारी बालासाहेब लोमटे तर अध्यक्ष स्थानी स्वा रा ती चे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना सोनू डगवाले पुढे म्हणाले, पत्रकार आणि कलावंत यांचं नात जुळत, कलावंत आणि डॉक्टर यांचं नात जुळत मात्र पत्रकार आणि डॉक्टर यांचं नात जुळलेली असतात अशी राज्यात फार दुर्मिळ उदाहरण आहेत. आज पत्रकारांच्या पुढाकारातून डॉक्टरचा सत्कार होतोय हे पहिल्यांदा पहातोय.
पत्रकार ही अशी शक्ती आहे ज्या पत्रकारांनी अनेक नेते घडवले आणि अनेक नेते घरी बसवले आज अंबाजोगाईचे पत्रकार डॉक्टरांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहेत हे या भव्य कौतुक सोहळ्या वरून स्पष्ठ होतंय.
प्रकाशजी बोरगावकर यांच्या विषयी बोलताना सोनू म्हणाले की लातूर ने अंबाजोगाई ला दिलेली गिफ्ट म्हणजे प्रकाश बोरगावकर असून मी 20 वर्ष ज्या गुरुजीकडे शिकलो त्यांचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं मात्र त्यांच्या कडून माझ्यावर कौतुकाची थाप पडली नाही आज डॉ इंगोले यांनी संगीत क्षेत्रात मिळवलेल्या लौकिका बद्दल प्रकाश बोरगावकर यांनी जी कौतुकाची थाप दिली त्या बद्दल त्यांचं कौतुक केलं.
या वेळी बोलताना डॉ श्रीनिवास रेड्डी म्हणाले की, पॉझिटिव्ह एनर्जी काय असते ते डॉ इंगोले यांच्या कडुन शिकायला हवी त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचे काम करताना आमच्या सारख्या डॉक्टर मंडळी मध्ये ही नवं चेतन्य आणण्यासाठी जे प्रयत्न केले त्याला तोड नाही.
या वेळी सत्काराला उत्तर देताना
डॉ राजेश इंगोले म्हणाले की, कोल्हापूर च्या कलावंत व रसिकांनी सिफा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी माझी निवड केली हे मी माझं भाग्य समजतो व या निवडीतून माझा संगीत क्षेत्रात जो नावलौकिक झाला या मूळ माझा हा गौरव आज मराठी पत्रकार परिषद व अंबाजोगाईच्या कलावंतांच्या पुढाकारातून होतोय. माझ्यावर प्रेम करणारी माणसे सत्काराला या ठिकाणी आली असून आभाळा एवढ्या उंचीची ही मानस आहेत, मला जीवनात प्रेरणा देणारी माणसे मिळाली या पैकीच प्रकाश बोरगावकर, दत्ता अंबेकर हे असल्याने अंबाजोगाईच्या मातीशी माझी नाळ जोडली आहे.
आपल्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकताना डॉ राजेश इंगोले भावुक झाल्याने त्यांना आपल्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत.
अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ शंकर धपाटे म्हणाले की, डॉ राजेश इंगोले हे एक एनर्जीक रसायन असून त्यांनी कोविड काळात केलेले कार्य हे कोणीही नाकारू शकत नाही.
या प्रसंगी आय एम ए महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतीक कार्यकारणीवर मध्यवर्ती सदस्य म्हणून अंबाजोगाईचे नेत्ररोग तज्ञ डॉ योगेश मुळे ,बालरोगतज्ञ डॉ विजय लाड व नेत्ररोगतज्ञ डॉ प्रज्ञा किनगावकर यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कलाकार कट्टाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश बोरगावकर यांनी डॉ राजेश इंगोले व सोनू डगवाले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन परमेश्वर गित्ते तर आभार प्रदर्शन दत्तात्रय अंबेकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बळीराम उपाडे, नाना गायकवाड, बालाजी शेरेकर, रोहिणी गायकवाड, अभय जोशी, शिवकुमार मोहेंकर, महादेव माने, प्रशांत लाटकर, गजानन मुडेगावकर, ज्ञानेश मातेकर, अशोक दळवे, मारुती जोगदंड, मुशीर बाबा, शेख फिरोज, व्यंकटेश जोशी, बाळासाहेब फुलझळके यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी डॉ लक्ष्मण लाड, डॉ चंद्रकांत चव्हाण, डॉ उद्धव शिंदे, डॉ इम्रान सर, डॉ जुबेर शेख, डॉ सचिन चाटे, डॉ बळीराम मुंडे, डॉ कौस्तुभ कुलकर्णी, डॉ योगेश सुरवसे, डॉ बचुटे, डॉ पेस्ते, डॉ प्रतीक सिरसाट, डॉ विनायक गडेकर, डॉ चामनर, डॉ जैन, डॉ बालासाहेब हाके, डॉ अविनाश देशमुख यांच्या सह जेष्ठ पत्रकार अ र पटेल, सुदर्शन रापतवार, सलीम गवळी, प्रकाश लखेरा, नागनाथ वारद, संजय राणभरे, परमेश्वर वैद्य, आभिजित लोमटे, सतीश मोरे, नागेश औताडे, संजय जोगदंड, अरेफ सिद्धीकी, विष्णू कांबळे, सय्यद नईम आदी मराठी पत्रकार परिषद व अन्य संघटनाचे पदाधिकारी, आय एम ए चे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील कलावंत, समाधान हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग व डॉ इंगोले यांचे शुभ चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles